Home क्राईम पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

0
22

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माहेरहून ३ लाख रुपये आणावे अशी मागणी करत विवाहितेला मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील माहेर असलेल्या काजल गणेश धनगर या महिलेचे चोपडा तालुक्यातील गलवाडे येथील गणेश गुलाब धनगर यांच्यासोबत विवाह झाला आहे. लग्नानंतरचे काही वर्ष चांगल गेले. त्यानंतर पती गणेश धनगर याने विवाहितेला माहेरहून ३ लाख रुपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेच्या आई-वडिलांची परिस्थिती हालकीच्या असल्या कारणामुळे त्यांनी पैसे आणले नाही. त्यामुळे याचा राग मना ठेवून पती पती गणेश धनगर याने मारहाण केली तर सासू-सासरे यांनी देखील गांजपाठ केला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहिता कंटाळून माहेरी निघून आल्या. दरम्यान विवाहितेने बुधवारी ५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती गणेश गुलाब धनगर, सासू उषा गुलाब धनगर, सासरे गुलाब शंकर धनगर, जेट श्याम गुलाब धनगर सर्व राहणार गलवाडे तालुका चोपडा यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहे.


Protected Content

Play sound