नवी दिल्ली वृत्तसंस्था । अयोध्या येथील नियोजीत श्रीराम मंदिराच्या भूमिपुजनासाठी पंतप्रधान मोदी यांच्या दौर्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून ते यात देशवासियांनी संबोधित करणार आहेत.
श्रीराम मंदिराचे भुमीपूजन ५ ऑगस्ट रोजी होत आहे. या भव्य कार्यक्रमासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. तसेच सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा भूमिपूजन सोहळा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. नरेंद्र मोदी भूमिपूजनानंतर देशाला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधानांचा अयोध्येतील ममिनिट टू मिनिटफ कार्यक्रम नेमका कसा असणार हे जाणून घेऊया.
असा असणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संपूर्ण कार्यक्रम
* ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३५ वाजता लखनऊ विमानतळावर लॅडिंग
* १०.४० हेलिकॉप्टरने अयोध्येसाठी रवाना होणार
* ११.३० वाजता अयोध्याच्या साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर लँडिंग
* ११.४० वाजता हनुमानगढी येथे पोहचल्यानंतर दर्शन आणि पूजा
* १२ वाजता राज जन्मभूमी परिसरात पोहचणार
* रामलल्लांचे दर्शन आणि पूजा
* १२.१५ वाजता रामलाला परिसरात पारिजातचे वृक्षारोपण
* १२.३० वाजता भूमिपूजन कार्यक्रमाला प्रारंभ
* १२.४० वाजता राम मंदिर आधारशिलाची स्थापना
* २.०५ वाजता साकेत कॉलेजच्या हेलिपॅडकडे प्रस्थान
* २.२० वाजता लखनऊमधून हेलिकॉप्टरने प्रस्थान
* लखनऊ वरून दिल्लीसाठी रवाना