नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. परंतु, मोदी आज नेमकं कोणत्या विषयावर जनतेला संबोधित करणार, हे अद्याप समजलेले नाही.
पीएमओ इंडियाच्या ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करू देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ते विविध मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधतील, असा असा अंदाज बांधण्यात येत आहे. तसेच सध्या भारत-चीन यांच्यातील वाढत्या तणावांबाबतही पंतप्रधान काही गोष्टी स्पष्ट करू शकतात, असेही बोलले जात आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या संवादा आधीच सरकारच्या वतीने सोमवारी ५९ चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.