नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते को-विन अॅप देखील लाँच करण्यात येणार आहे.
दिल्लीत लोकनायक जय प्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन या कार्यक्रमास उपस्थित राहू शकतात.
याशिवाय, कोरोना लस साठवलेल्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही ही मोहीम सुरू केली जाईल. दरम्यान, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसांना मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी लसीचा पुरवठा सुरू झाला होता आणि आता ही लस देशातील प्रत्येक राज्यात दिली जात आहे.