Home धर्म-समाज पंतप्रधान आवास योजनेंतर्गत भुसावळातील लाभार्थ्यांना पहिला हप्त मंजूर

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत भुसावळातील लाभार्थ्यांना पहिला हप्त मंजूर


भुसावळ प्रतिनिधी । पंतप्रधान आवास योजनेतंर्गत भुसावळ शहरातील लाभार्थ्यांना ४० हजार रूपयाचा पहिला हफ्ता मंजूर करण्यात आला. या योजनेतील ४८ लाभार्थ्यांना नगरपालिकेमार्फत बांधकाम परवानगी पत्र देण्यात आले होते. त्यापैकी २२ लाभार्थ्यांनी घरकुलचे काम सुरू करून वोटा लेव्हल पर्यंतचे काम पूर्ण केल्याने, भुसावळ शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्षा रमण भोळे यांच्या सहकार्याने व मुख्याधिकारी करुणा दहाडे यांच्या आदेशानुसार पहिला हफ्ता ४० हजार रूपये बँक खात्यात जमा करण्यात आला.

घरकुलचे लिंटर लेव्हल पर्यंतचे काम पूर्ण झाले असल्याने दुसरा ६० हजार रूपयाचा दुसरा हफ्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे. यावेळी दीपक धांडे यांच्यासह वंदना चौधरी, अनिल लोखंडे, शांताराम भोई, अनिल माखिजा, शेजवळ महाले यांच्यासह घरकुलाचे लाभार्थी उपस्थित होते.


Protected Content

Play sound