नवी दिल्ली वृत्तसंस्था । मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांसोबत चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिष्टमंडळासह दिल्लीत दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधानांची भेट घेतील. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे त्यांच्यासोबत आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पंतप्रधान मोदींची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळोवेळी पत्र लिहून अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे.