जळगाव प्रतिनिधी । शहरातील अल्पबचत भवनात पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अध्यक्षस्थानी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर तर पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांच्याहस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करत असलेल्या २७ शिक्षकांना तर जीवन गौरव कृषी व शिक्षण पुरस्काराने हिरालाल पाटील आणि हनुमंतराव पवार यांना सन्मानित करण्यात आले. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राम पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, डॉ. अनिल पाटील, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चेतन तांगडे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मीरा जंगले, वसंत नेरकर, जिल्हा सचिव राकेश पाटील, प्रा. देवेंद्र इंगळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी जिल्हाध्यक्ष विनोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. मनीषा पाटील, शैलेश शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रतिभा पाटील यांनी आभार मानले. मनोहर पाटील, गोपाल पाटील, महेंद्रसिंग जाधव, अजय पाटील, राकेश पाटील, महेंद्र पाटील, सुनील पाटील, भूषण अहिरराव, किसन सूर्यवंशी यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.
या कार्यक्रमात पंजाबराव देशमुख जीवन गौरव कृषी पुरस्कार अमळनेर येथील हिरालाल पाटील, जीवन गौरव शिक्षण पुरस्कार हणुमंतराव पाटील यांना देवून गौरवले. तर महात्मा फुले शिक्षक सन्मान पुरस्कार प्रा. देवेंद्र इंगळे, विजय पवार, हर्षल पाटील, विलास नेरकर, प्रवीण माळी, विजयसिंग पवार, संजय मोरे, नरेंद्र ठाकरे, जितेंद्र गवळी, सुनील वाघ, ज्ञानेश्वर माळी, सुनील नारखेडे, विजय देवरे, देवेंद्र पाटील, अशोक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पंकज शिंदे, महेश पाटील, रुपाली पाटील, पौर्णिमा फेगडे, वैशाली पाटील, सुलोचना देसले, प्रवाणी चौधरी, रोशन आरा शेख रफिक, शेख ईस्माईल सुलेमान, दिनेश मोरे यांना देण्यात आला.
समाजाच्या प्रगतीसाठीी शिक्षकांचे कार्य, योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी केले. तर या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शिक्षकांनी आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याकडे लक्ष द्यावे, तसेच आपल्या मागण्यांसाठी संघटनात्मक भेद विसरुन एकत्र येण्याचे आवाहन केले.