रावेर पंचायत समिती आढावा बैठकीस अधिकाऱ्यांची दांडी

 

रावेर, प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीची अधिका-यांचे प्रभारी राज महावितरण आणि कृषी यावरून बैठक चांगलीच गाजली. सभापती जितु पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा मासिक बैठक संपन्न झाली.

पंचायत समिती सभापती जितु पाटील, उपसभापती जुम्मा तडवी, पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, कविता कोळी, धनश्री सावळे, रुपाली कोळी उपस्थितीत होते. दरम्यान बैठकीला पी. के महाजन, प्रतिभा बोरोवले, माधुरी नेमाडे, योगिता वानखेडे, अनिता चौधरी यांची बैठलीला अनुउपस्थितीती होती. तर बैठकीचे कामकाज गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी पाहीले. पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीला पाणी पुरवठा विभाग, सिंचन विभाग, जि. प. बांधकाम विभाग, सार्वजनीक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, शालेय पोषण आहार, पशुसवंर्धन विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते. तर पुनर्वसन विभाग व तालुका कृषी विभागाच्या अधिका-यांनी बैठकीला दांड्या मारल्या होत्या.

Protected Content