फैजपूर प्रतिनिधी । शहरातील सहकारी संस्था व नगरसेवकांसह कार्यकर्ते आणि लोकसहभागातून यांच्यातर्फे न्हावी ग्रामीण रूग्णालयासाठी अडीच लाख रूपयाचे ३० बेडचे ऑक्सिजन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या संदर्भात प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना संपुर्ण जिल्ह्यात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ही बाब लक्षात घेता ग्रामीण भागातील रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासणार आहे. यासाठी फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी ही सुविधा लोकसहभागातून व्हावी, यासाठी आवाहन केले होते. फैजपूर शहरातील सहकारी संस्था व नगरसेवकसह कार्यकर्ते यांनी या आवाहनास प्रतिसाद देत न्हावी ग्रामीण रुग्णालयात सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून ही यंत्रणा उभारली जाणार आहे.
या यंत्रणेला लागणारा खर्च श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सातपुडा सह पतसंस्था व देवदास तुकाराम चौधरी सह पतसंथा यांचे कडून प्रत्येकी ५० हजार फैजपूरचे १४ नगरसेवकांकडून २ हजार ५०० रूपये, यावल तालुका मेडिकल असोसिएशन यांचेकडून ११ हजार रूपये, वसंतराव पाटील औद्योगिक वसाहत व अंबिका दूध उत्पादक सोसायटी, नितीन नेमाडे हे ही निधी देणार आहे. फैजपूर मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याकडून १० हजार रूपये, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाने १० हजार रूपये, व यावल शेतकी संघातर्फे ५ हजार रूपये याप्रमाणे निधी उभारण्याचे काम मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, नगरसेवक हेमराज चौधरी, मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध सरोदे, सातपुडा व्हाईय चेअरमन चंद्रशेखर चौधरी, पांडुरंग सराफ यांचे निधी उभारण्यास सहकार्य लाभत आहे. हे काम ग्लोबल एनर्जी कंपनी पुणे यांना देण्यात आले असून काम आठवड्याभरात पूर्ण होणार असल्याचे नरेंद्र नारखेडे यांनी सांगितले. सदर बैठकीसवरील मान्यवरासह तहसीलदार जितेंद्र कुवर, नरेंद्र नारखेडे, माजी जि.प.सदस्य भरत महाजन, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, चंद्रशेखर चौधरी, हेमराज चौधरी, अनिरूध्द सरोदे उपस्थित होते.