जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माझ्याविरोधात साक्ष देतो, तुला बघून घेईन अशी धमकी देत वृध्दाला शिवीगाळ केल्याची घटना जळगाव जिल्हा न्यायालयाच्या गेटच्या बाहेर घडली. याप्रकरणी एका जणांविरोधात मंगळवार, २४ जानेवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा अदखलपात्र दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील गणेश कॉलनी येथे रमेश तानाजी पाटील वय ६३ हे वास्तव्यास आहे. त्यांची गेंदालाल मीलमधील अजिजखान ऊर्फ बाबा बाबु खान यांच्याविरोधात केस सुरु आहे. २३ जानेवारी कोर्टात या केसची तारीख असल्याने रमेश पाटील हे त्यांच्या मुलासह हजर होते, यादरम्यान न्यायालयाच्या गेटच्या बाहेर अजिजखान ऊर्फ बाबा बाबु खान याने रमेश पाटील यांना व त्यांच्या मुलाला उद्देशून तुझे दोन साक्षीदार मी फोडून टाकले आहेत, आता तु व तुझा मुलगा बाकी आहे तुम्हाला पण बघून घेईन अशी धमकी देवून शिवीगाळ केली. याप्रकरणी रमेश पाटील यांनी मंगळवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अजिजखान ऊर्फ बाबा बाबु खान यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सर्जेराव क्षीरसागर हे करीत आहेत.