नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नोव्हेंबरपर्यंत जगभरातील देशांना कोरोनाची लस उपलब्ध होईल अशी माहिती लशीसाठी रिसर्च फंडिंग करणाऱ्या समूहाचे प्रमुख किरिल दमित्रीव यांनी दिली आहे. त्यानुसार भारतालाही नोव्हेंबर महिन्यात लस मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाने मंगळवारी लस शोधल्याचा दावा केला होता.
आतापर्यंत २० देश रशियाने तयार केलेली लस खरेदी करण्यासाठी तयार झाले आहेत. भारतालाही ही लस नोव्हेंबरपर्यंत मिळू शकेल असा अंदाज आहे. या लशीने मानवी चाचणीचा तिसरा टप्पा अद्याप पूर्ण केला नसल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे ही लस सफल झाली आहे असे म्हणता येणार नाही, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरडीआयएफचे प्रमुख किरिल दमित्रीव यांनी मात्र ही लस सेफ असल्याचा दावा केला आहे. येत्या काही दिवसात लस दिल्यानंतरचा डेटाही प्रकाशित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रशिया भारताला ही लस नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध करून देऊ शकेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.