नैसर्गिक वाढीव वर्गाच्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेच्या समोर आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नैसर्गिक वाढीव वर्ग व तुकड्यांना शासकीय नियमानुसार अनुदान मिळावे, यासाठी शासनाकडून 16 ऑगस्ट 2012 रोजी व त्यानंतर नैसर्गिक वाढीव वर्ग तुकडी मिळालेल्या आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार वयाच्या चौथ्या वर्षी 20 टक्के अनुदान व त्यानंतर प्रत्येकी ४०, ६०, ८० आणि १०० टक्के अनुदान मिळणे अपेक्षित होते. परंतु आजपर्यंत या नैसर्गिक वाढीव वर्ग किंवा तुकड्यांना शासनाकडून कोणतेही अनुदान मिळालेले नाही. अनुदान मिळावे म्हणून संघटनेने प्रत्येक अधिवेशनात अनुदानाचा मुद्दा लावून धरला शासनाकडून प्रत्येक वेळी फक्त आश्वासने मिळाली असून आतापर्यंत कोणतेही अनुदान व अनुदानाची घोषणा करण्यात आले नाही. तसेच बुधवार 14 ऑक्टोबर 2020 रोजी शासनाने घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 20 टक्के, 40 टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा निर्णय घेतला आला. पण नैसर्गिक वाढीव वर्ग व तुकड्यांचा विषय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मंत्रालय स्तरावरील प्राथमिक माध्यमिक नैसर्गिक वाडी वर्ग नैसर्गिक वाढीव तुकड्यांना निधीसह घोषित करावे, आयुक्त कार्यालय पुणे स्तरावरील अघोषित नैसर्गिक तुकड्या/ वर्ग लवकरात लवकर तपासून मंत्रालयात पाठवावे. गेल्या दोन वर्षांपासून मंत्रालय स्तरावर धूळ खात पडलेल्या उच्च माध्यमिक वर्ग तुकड्यांना निधीसह घोषित करावे असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर रोशन शेख, जितेंद्र पाटील, रिजवान खान, गौरव घोडेस्वार, आसिफ शेख, किशोर घुले, मोहम्मद इक्बाल यांच्यासह शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1233229240377030/

Protected Content