जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक नैराश्येतून खंडेराव नगरातील ३५ वर्षीय तरूणांने जळगाव-शिरसोली रेल्वे दरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, रमेश दगडू भोई (वय-३५) रा. नशिराबाद ता.भुसावळ ह.मु.खंडेराव नगर जळगाव हे शेंगदाणे व फुटाणे विकण्याचे काम करतात. पती पत्नीच्या कौटुंबिक वाद झाल्याने पत्नी आशा ह्या मुलासह माहेरी निघून गेलेल्या आहेत. खंडेराव नगरात आई कमलाबाई वडील दगडू भोई आणि भाचा अभिजित भोई यांच्यासोबत राहतात. गेल्या चार ते पाच वर्षांपासून पत्नी माहेरी गेल्याने नैराश्येतून गुरूवारी ६ रात्री १२ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. दरम्यान भाचा अभिजित याने रात्रभर शोधाशोध सुरू केली असता मिळून आले नाही. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास जळगाव -शिरसोली दरम्यान रेल्वे डाऊन खंबा क्रमांक ४२४ ते ४२६ दरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. रामांनद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पो.कॉ. विश्वनाथ गायकवाड करीत आहे.