जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नेहरू नगरातून एका तरूणाच्या उघड्या घरातून २५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी १८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मोहित जयप्रकाश दारा (वय-२५, रा. मोहाडीरोड, नेहरू नगर,जळगाव) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १४ एप्रिल रोजी सकाळी साडे पाच ते साडे सहा वाजेच्या दरम्यान घर उघडे असतांना अज्ञात चोरट्याने घरात घुसून २५ हजाराचा लॅपटॉप चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मोहित दारा याने परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू लॅपटॉप संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी १८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता एमआयउीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरूणाने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोलीस नाईक सुधीर सावळे करीत आहे.