जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव बस आगाराचे नेरीनाका येथे एसटी वर्कशॉप विभागीय भंडार आहे. त्या ठिकाणी लिपिकानेच १ लाख ९९ हजार ३७० रुपयांची अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवार २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव बस आगाराचे नेरीनाका येथे एसटी वर्कशॉप विभागीय भंडार आहे. या ठिकाणी बसेस दुरुस्तीसह इतर सामान ठेवले जातात. या ठिकाणी हेमराज युवराज पाटील रा. चिंचोली ता. यावल हे लिपिक म्हणून काम करतात. 15 मार्च 2019 ते 24 सप्टेंबर 2019 दरम्यान हेमराज पाटील यांनी ट्रान्सपोर्टमधून सामान सोडवण्यासाठी 1 लाख 99 हजार 370 रुपयांची वेळोवेळी अग्रीम रक्कम उचलून या रकमेचा समायोजन न करता याचा अपहर केल्याचे निष्पन्न झाले. या रकमेत मोठा अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर विभाग भंडाराचे अधिकारी विशाल बळीराम राखुंडे (वय-42) यांच्या लक्षात आले. त्यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी लिपिक हेमराज युवराज पाटील रा. चिंचोली ता. यावल जि. जळगाव याच्या विरोधात अपहार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.