यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नॅशनल एज्युकेशन वेल्फेअर सोसायटीची कार्यकारणी अनाधिकृत असून त्यांनी घेतलेली शिक्षण पदभरती व शिक्षण भरती रद्द करण्यात यावी अशी मागणी समाजसेवक व सोसायटीच्या काही सभासदांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यामिक) यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, नॅशनल एज्युकेशन वेल्फेअर सोसायटीची कार्यकारणीची घटना नियमबाह्य असल्याने हे कार्यकारी मंडळाला शिक्षण पध्दती व कोणताही आर्थिक किंवा विकास करण्याच्या हक्क अधिकार नाही. ही पद भरती तत्काळ रद्द करण्यात यावी. या कार्यकारी मंडळाचे घटनाच्या नियमानुसार त्यांचे धर्मदाय आयुक्त कार्यालय जळगाव येथील शुडयुल वन वर ते नाव नमूद नसल्याने त्यांना संस्थाचे व शाळाचे कोणती कार्य करण्याच्या मुंबई पब्लिक ट्रस्ट अधिनियमानुसार व त्यांची घटनाचे अनुसार अधिकार नसल्याने हे शिक्षण पद भरती रद्द करण्यात यावी. नॅशनल एज्युकेशन सोसायटी यावल व त्यांचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी लबाडी करून आपल्या संस्थामार्फत चालणाऱ्या विद्यालयात सन फेब्रुवारी / मार्च २०२१ मध्ये शिक्षण भरती काढली. तिच्यात घोळ निदर्शनास आल्याने ती रद्द केली. दि.१२/०८/२०२१ व १४/०८/२०२१ रोजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती काढली त्यातुन मोठा घोळ केला. संस्था चालकांचे नातेवाईकांची बोगस टी.ई.टी भरती करत होते. त्यांची तक्रार शिक्षणाधिकारी (माध्य.), मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसंचालक माध्य. नाशिक, .संचालक माध्य. व उच्च माध्य.पुणे तसेच शिक्षण व क्रीडा मंडळ मंत्रालय सचिव व शिक्षणमंत्री ना.वर्षा गायकवाड यांचेमार्फत करण्यात आली चौकशी झाली. सर्व भरती तात्काळ रद्द करण्यात आली. आता पुन्हा संस्था चालकाने नविन खेळ शुरू केला. ज्या उमदेवाराकडे २५,००,०००/-, ३० लाख रूपये घेतले होते ते शासनाने व शिक्षणाधिकारी ५०% जागा भरण्याची परवानगी दिली असल्याची दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. शासनाकडून शिक्षण भरती प्रक्रीयाला २०१६ पासून बंद असून कोरोनामुळे वित्त विभागाने सुध्दा बंदी केली आहे. शिक्षणाधिकारी माध्य. यांचे दि.१५/०५/२०२० शुध्द पत्र आहे की आपल्या सर्व जिल्हयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीची भरती प्रक्रिया वर बंदी आहे.
ही संस्था शासनाचे नियम व घटनाप्रमाणे सुध्दा बोगस आहे. कारण या नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे निवडणुक प्रक्रिया दि.१४/०५/२०१४ रोजी झाली होती. त्यांची ३ वर्षाची मुदत होती. एप्रिल २०१७ रोजी या संस्थाची मुदत संपली आहे. पण या संस्थेत बसलेले चोर सहा.धर्मदाय आयुक्त जळगाव यांची सुध्दा दिशाभुल करत आहे. यांच्याकडे संस्थेची मुदत घटना व नियमाप्रमाणे शासन आदेशाप्रमाणे संपली आहे असे केस सुरू आहे. पुढील चौकशी दि.२४ मे २०२२ रोजी आहे. यासंदर्भात अनेक चौकश्या न्यायालयात सुरू आहे. जिल्हयात अन्य सर्व संस्थांमध्ये शिक्षक भरती बंद असतांना यांना भरती करण्याची परवानगी कोणी दिली. यांच्यासाठी शासनाने कोणते नियम लागु होत नाही का ? दि. १४ मे २०२२ रोजी जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याची भरती करण्यासाठी उमेदवारांना बोलविले आहे. तात्काळ यांची भरती प्रक्रिया रद्द करा नाही तर कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन पुकारू असा इशारा दिला आहे.
निवेदनावर समाज सेवक हाजी गुलाम मुस्तुफा, हाजी गुलाम दस्तगीर , नॅशनल एज्युकेशन सोसायटी आजीव सभासद आसीफ खान ताहेर खान , युनूस खान रशीद खान, शे.अमीनोद्दीन शफीयोद्दीन, सभासद अ.मुनाफ शे.ताहेर, नजीर खान अमीर खान, नजीर खां अमीर यांची स्वाक्षरी आहे.