जळगाव, प्रतिनिधी । येथील नूतन मराठा महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मविप्र संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब निंबाळकर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या प्रांगणात ७४ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना संक्रमणाच्या या काळात शासकीय नियमांचे पालन करीत प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून व्हाईस चेअरमन बाळासाहेब निंबाळकर उपस्थित होते.
त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्यांनी देशसेवा केली व करीत आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगावी. मविप्र संस्थेच्या अडचणी व समस्या दूर करण्यासाठी सहकार्य व संवादातून मार्ग काढीत प्रगतीकडे जाऊया, असे निंबाळकर म्हणाले. मंचावर प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख, उपप्राचार्या प्रा. सोनवणे, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक खैरनार उपस्थित होते. संजय रणनवरे यांनी सूत्रसंचालन केले. चेअरमन नीलकंठ काटकर व सचिव निलेश भोईटे यांची सदिच्छा संदेश दिला.