जळगाव प्रतिनिधी । नूतन अजिंठा हौसिंग सोसायटी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी किल्ल्याच्या प्रतिकृतीसोबतच शिवाजी महाराजांच्या शेती आणि शेतकऱ्यांविषयीच्या विशेष जिव्हाळ्यामुळे शेती आणि ग्रामिण जिवनाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. यामध्ये शेती, ग्रामिण भागतील घर, लोक, मावळे, विहिरी, बैलजोडी, पक्षी आदिंच्या प्रतिकृती साकारल्या आहेत.
यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक शिवश्री बी. बी. पाटील, शिवमती सुनिता पाटील, शिवमती भाग्यश्री पाटील, शिवमती अलका महाजन, शिवमती संगिता शिंदे, शिवमती रुपाली महाजन आदिंसह लक्षिता पाटील, मोक्षदा महाजन, श्रेयसी शिंदे, स्वराली शिंदे, युविका पाटील, ओम शिंदे, शंभू शिंदे, रेवतेश पाटील आदि बच्चे कंपनीने दणदणीत घोषणांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला.
यासाठी शिवमती सुनिता पाटील, शिवमती भाग्यश्री पाटील, शिवमती अलका महाजन, शिवमती ललिता पाटील यांनी संकल्पनेसह प्रतिकृती साकारली.