निसर्ग कॉलनी येथील बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला  

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील श्रीराम चौकातील निसर्ग कॉलनी येथील बंद घर फोडून चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपाली सतीश सोनवणे (वय-33) रा. श्रीराम चौक, निसर्ग कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तवाला आहे. दिवाळीनिमित्त महिला घर बंद करून बाहेरगावी गेल्या होत्या. घर बंद असल्याचा फायदा घेत आज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील २० हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघड केला आला आहे. या संदर्भात महिलेने शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहे.

Protected Content