Home धर्म-समाज निवासी मतिमंद विद्यालयात शीघ्र निदान व उपचार केंद्राची स्थापना

निवासी मतिमंद विद्यालयात शीघ्र निदान व उपचार केंद्राची स्थापना

0
40


 

फैजपूर, प्रतिनिधी । रा.ए. शि.प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित निवासी मतिमंद मुला-मुलीची शाळा(सावदा)फैजपूर येथे शीघ्र निदान व उपचार केंद्राची स्थापना करण्यात आली असून या केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्ष महानंदा होले यांच्या हस्ते करण्यात आले.

केंद्राच्या उदघाटनप्रसंगी  प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक मिलिंद वाघुळदे, फैजपूर सावदा वसाहतीचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन कुलकर्णी यांनी केले. आभार शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. याश्वितेसाठी अधिक्षक अजय न्हावी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound