नवी दिल्ली, वृत्तसेवा । बिहार निवडणुकांपूर्वी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु लवासा यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रपतींकडे कार्यमुक्त करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं राष्ट्रपतींचे माध्यम सचिव अजय कुमार सिंग यांनी सांगितलं.