सांगली | ”जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश मग आपला क्रमांक एक नंबर कधी येणार ? लाज वाटत नाही. निर्लज्ज लोकांचं देश म्हणजे हिंदुस्थान” असे म्हणत सांगली मध्ये दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी बोलत असताना संभाजी भिडे यांची जीभ घसरली. यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सांगलीमध्ये दुर्गामाता दौडच्या समारोप प्रसंगी साभाजी भिडे म्हणाले की, जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश, मग आपला, देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत? लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही, चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन, वैरी, मारेकरी, गनीम, शत्रू आहे, पण हिंदूना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे. तो म्हणजे निर्लज्जपणात. जगाच्या पाठीवरती १८७ राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, एक अब्ज २३ कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे असं संभाजी भिडे म्हणाले.
भिडे पुढे म्हणाले की, कोरोना येतो, हा थोतांड आहे. कोरोना हा काल्पनिक आहे. कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणारा कोरोना आहे. कोरोना हा थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या अंतःकरणात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची वस्ती असती. तर सबंध देशाचं नेतृत्व करणारे ठरले असते.