नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तिघा दोषींनी आता फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे.
विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता या तिघांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका दाखल केली आहे. दिल्ली न्यायालयाने चारही आरोपींना २० मार्च रोजी फासावर लटकवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब करुन झाल्यानंतर आता तिघा दोषांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्र सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गुरुवारी म्हटले होते, की दोषींनी सगळ्या सिस्टिमची थट्टा केली आहे. दरम्यान, तिघां दोषींना 4 दोषींना 20 मार्च रोजी फासावर लटकवले जाणार आहे. दरम्यान निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा मिळालेल्या चारही आरोपी विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश यांच्या नातेवाईकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. इच्छामृत्यूची मागणी करणाऱ्या आरोपींच्या नातेवाईकांमध्ये वयस्कर आई, वडील, भाऊ-बहिण आणि मुलांचा समावेश आहे.