निरंजनी आखाड्याच्या माफीनाम्याची साधूंची मागणी

 

 हरिद्वार : वृत्तसंस्था । कोरोना  पार्श्वभूमीवर कुंभमेळा समाप्तीची घोषणा करणाऱ्या निरंजनी आखाड्याने माफी मागावी अशी मागणी   हरिद्वारमधील अन्य आखाड्यांनी केली. निरंजनी आखाड्याला अशा घोषणेचा अधिकारच नाही, असे साधूंनी म्हटले आहे.

 

निरंजनी आखाडा हा कुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या १३ आखाड्यांपैकी एक आहे. आमच्यासाठी कुंंभमेळा समाप्त झाल्याची घोषणा गुरुवारी हरिद्वारमध्ये या आखाड्याने केली. मुख्य शाही स्नानाचा कार्यक्रम संपला आहे. आखाड्यातील अनेकांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, त्यामुळे आमच्यासाठी कुंभमेळा समाप्त झाला आहे, असे निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी यांनी म्हटले आहे.

 

कुंभमेळा अधिकारी किंवा मुख्यमंत्री यांनाच कुंभमेळा समाप्त झाला असे जाहीर करण्याचा अधिकार आहे, असे निर्वाणी आखाड्याचे अध्यक्ष महंत धरमदास यांनी म्हटले आहे. निरंजनी आखाड्याने अन्य आखाड्यांच्या अनुमतीविना कुंभमेळा समाप्त झाल्याचे जाहीर करून साधूंमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा अक्षम्य गुन्हा केला आहे. त्यामुळे निरंजनी आखाड्याने आखाडा परिषदेची माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले.

Protected Content