धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील ओपन जागेत नियोजित उद्यानात स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा यांचे तैलचित्र असलेले स्मारक बांधून त्यांचे नाव सदरील उद्यानास द्यावे अशी मागणी परीट धोबी समाजाच्या वतीने नगरपालिकेचे संजय मिसर यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली.
आज समाजबांधवांतर्फे नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, राष्ट्रसंत शहरात गाडगेबाबा यांचे कोणतेही सुशोभित स्मारक बनविण्यात आलेले नाहीत तरी आपण याचा विचार करून यावर कार्यवाही करावी अशी मागणी यात करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी जेष्ठ समाज सेवक भिका महाले,हिरामण जाधव,प्रकाश वामन जाधव,समाज अध्यक्ष अशोक जाधव,गणेश सुभाष जाधव,छोटू जाधव,गणेश जाधव,प्रकाश जाधव,कन्हैया रायपूरकर,विनोद जाधव,राजू सूर्यवंशी, नितीन जाधव,शंकर जाधव,संजय सूर्यवंशी,विजय शिंदे,विक्की जाधव,कन्हैया नेरकर आदींसह समाज बांधव उपस्थित होते.