जळगाव प्रतिनिधी । निमखेडी शिवारातील श्रीकृष्ण हौसिंग सोसासयटीमध्ये राहणाऱ्या छत्तीस वर्षीय विवाहीतेच्या छातीत आणि डोक्यावर लोखंडी पहार ने हल्ला चढवुन पती-पत्नीने जखमी केल्याची घटना घडली. बचतगट बंद करायचा आहे असे सांगून आठशे रुपयांच्या चेकवर सही देण्यास नकार दिल्याने वाद होवुन या विवाहीतेला दोघांना मारले. याप्रकरणी तालूका पेालिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, उज्वला कैलास मिस्त्री (वय-३६) रा. निमखेडी शिवारातील श्रीकृष्ण हौसिंग सोसायटी या रघुवीर समर्थ बचतगटाच्या सदस्य आहेत. गुरुवार (ता.२) रेाजी दुपारी उज्वला मिस्तरी अंगणात भांडे घासत असतांना माधुरी शत्रुघ्न सैंदाणे पतीला सेाबत घेवुन त्यांच्या घरी आल्या. आम्हाला बचत गट बंद करायचा आहे, असे सांगत आठशे रुपये पत हवे म्हणुन चेकवर सहि मागत होत्या. मात्र, बचतगट प्रमुख प्रतिभा पाटिल आल्यावर मी, त्यांच्या समक्ष सहि देईल असे सांगीतल्यावरुन वादाला सुरवात झाली. हाणामारी होऊन शत्रुघ्न आत्माराम सैंदाणे यांनी लोखंडी पहार उचलून ती, उज्वला यांच्या छातीत आणि डोक्यावर मारुन जखमी केले. जखमी अवस्थेत उज्वला मिस्तरी यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते, शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदवल्यावर आज प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस नाईक साहेबराव पाटिल तपास करीत आहेत.