Home क्राईम निमखेडी येथून शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

निमखेडी येथून शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

two wheelar thift

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील निमखेडी बु ॥ येथील शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, गजानन श्रीराम मुंडे (वय-३७) रा. निमखेडी बु ॥ ता. मुक्ताईनगर हे शेतीचे काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीजी ५२८८) क्रमांकाची दुचाकी आहे. २४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता त्यांनी दुचाकी घरासमोर लावली होती. २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस नाईक संदीप खंडारे करीत आहे. 


Protected Content

Play sound