जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील माहेर असलेल्या विवाहितेचा दोन लाख रुपयांसाठी छळ करणाऱ्या विवाहितेच्या पतीविरोधात बुधवार, १५ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निमखेडी येथील मनिषा संदीप जाधव यांचा विवाह चोपडा तालुक्यातील वढोदा येथील संदीप आनंदा जाधव यांच्याशी झाला आहे. मनिषा हिने तिच्या माहेरुन दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी तिचे पती संदीप जाधव यांनी केली, मनिषा हिने पैसे न दिल्याने पती संदीप याने मनिषा हिस वेळावेळी शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच शारिरीक व मानसिक छळ केला. हा त्रास असह्य झाल्याने मनिषा जाधव हिने याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन बुधवारी मनिषा हिचे पती संदीप जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकूर हे करीत आहेत.