नवी दिल्ली वृत्तसंस्था । बाबा रामदेव यांनी आजवर एकाही संन्याशाला हा किताब न मिळाल्याबाबत खंत व्यक्त करून निदान एका तरी संन्याशाला भारतरत्न हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
भारतरत्न पुरस्कारावरून वाद सुरू झाले असतांना आता यात बाबा रामदेव यांनीदेखील उडी घेतली आहे. आत्तापर्यंत, महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद किंवा शिवकुमार स्वामीजी यांना पुरस्कार मिळायला हवा होता. मात्र, गेल्या ७० वर्षात एकाही संन्याशाला भारतरत्न देण्यात आला नाही, दे दुर्भाग्य असल्याचं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलंय. तसेच पुढच्यावर्षी तरी एखाद्या सन्याशाला भारतरत्न द्या, अशी मागणीही बाबा रामदेव यांनी केली आहे. दरम्यान, तसेच २०१९ मधील निवडणुकीत काट्याची टक्कर होऊ शकते. कोणत्याही पक्षाला जाती आणि धर्माच्या बंधनात अडकवू नका. देशाला शैक्षणिक, आर्थिक, चिकित्सक आणि अन्य गुलामगिरीतून स्वतंत्र मिळावा यासाठी संकल्प करा, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.