जळगाव प्रतिनिधी । महापालिकेच्या १९-अ प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवार निता सोनवणे यांची पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
लता चंद्रकांत सोनवणे यांची आमदारपदी निवड झाल्यानंतर १९-अ या प्रभागासाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया नुकतीच झाली. यात निता मंगलसिंग सोनवणे यांच्यासह आशा कोळी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र कोळी यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध आधीच निश्चित झाली होती. आज याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आज त्यांना निवडचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/185907579430588/