धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निशाणे बसच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांच्या मागणीवरून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून बस सुरू करण्याचे आदेश दिले.
गेल्या अनेक दिवसापासून निशाणे बस बंद होती. निशाणे ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी ना.गुलाबराव पाटील यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी धरणगाव ते निशाणे बस सुरू करण्याची विनंती केली होती. गुलाबराव पाटील यांनी एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून बस सुरू करण्याचे आदेश दिले. आज रोजी एसटी महामंडळाच्या टीमने निशाणे येथे येऊन पाहणी केली व विद्यार्थी मित्रासाठी व प्रवाशांसाठी बस सुरू करण्याचे आश्वासन दिले. निशाणे गावातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना अतिशय आनंद झाला.
या प्रसंगी बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष पी एम पाटील, ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील यांनी पाठपुरावा करून बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. एस टी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. आप्पासाहेब पाटील, दादा पाटील, लटकन पाटील, देविदास पाटील, हितेश कोळी, निलेश महाजन, अंकुश पाटील, भाऊसाहेब पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.