ना. गडकरी यांची वरणगावच्या नगराध्यक्षांनी घेतली भेट (व्हिडिओ)

वरणगाव, प्रतिनिधी । वरणगाव शहरातील समांतर महार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची पुन्हा नागपुरात  नगराध्यक्ष सुनील काळें यांनी शिष्टमंडळासोबत भेट घेत सविस्तर प्रस्ताव सादर केला.

 

वरणगाव  बायपासने संपूर्ण वाहतूक शहराबाहेरून जात असल्याने वरणगाव शहराचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र वरणगावकरांचे अस्तित्व संपू देणार नाही ही खूणगाठ मनाशी बांधून वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी १४  व १५  जुलै रोजी राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांच्या नेतृत्वात  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली व निवेदन दिले होते. त्यावेळी ना. गडकरी यांनी  मी नागपुरात असतांना संपूर्ण प्रस्ताव घेऊन या तिथे सर्व अधिकारी असतील तिथे निर्णय घेउ असे सांगितले होते. त्याअनुषंगाने आज नागपूरमध्ये पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची  भेट डॉ. राजेंद्र फडके यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष सुनील काळे, शहराध्यक्ष सुनिल माळी, किरणं धुंदे यांनी भेट घेत विस्तृत प्रस्तावा दिला. या  प्रस्तावात फुलागाव फाटा  बसस्थानक चौक ते  साईबाबा मंदिरापर्यंत समांतर महामार्ग बनविणे. त्यात दुभाजक टाकून लाईट( एलईडी) लावणे, बस स्थानक चौक येथे भव्य सर्कल नागरिकांनां बसण्यासाठी व बस स्टफ प्रवासी शेड तसेच शिवाजी नगर बसस्थानक सदानंद टॉकीज व सातमोऱ्यावरील पूल नवीन बांधणे तसेच तीर्थक्षेत्र नागेश्वर ते  वरणगाव ऑर्डन्स फॅक्टरी दरम्यान रस्ता बनविणे या मागण्या सविस्तर प्रस्तावात सादर करण्यात आल्या.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण बाजू शांततेत ऐकून घेत व समांतर महामार्गाच्या कामाची सकारत्मकता दाखवली. यावेळी केंद्रीय मंत्री  ना.  नितीन गडकरी यांचे व  डॉ. राजेंद्र फडके,  नही चे राज्यस्तरावरील अधिकारी यांचे आभार माजी नगराध्यक्ष सुनील काळे व शहराध्यक्ष  सुनील माळी भाजपा शहर चिटणीस किरण धुंध्ये यांनी मानले.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/520474905879758

 

Protected Content