नाशिक विभागातून विज्ञान मेळाव्यात नयन कोष्टी प्रथम

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   नाशिक विभागस्तरीय स्पर्धा अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात आर. के. एम. विद्यालयाचा विद्यार्थी नयन महेश कोष्टी याने प्रथम क्रमांक पटकावला व राज्यस्तरासाठी निवड झाली.

 

शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान आव्हाने व शक्यता या विषयावर नाशिक येथील कोठारी कन्या विद्यालय येथे विभागस्तरीय स्पर्धेत आर. के. एम. विद्यालयाचा इ. ९  वीचा विद्यार्थी नयन महेश कोष्टी याने प्रथम क्रमांक पटकावला व राज्यस्तरासाठी निवड झाली. या  स्पर्धेत नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या चार जिल्ह्यातील आठ  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धकांनी केलेले सादरीकरण त्यासाठी आवश्यक पीपीटी व त्यावर आधारित तोंडी प्रश्न विचारण्यात आले होते व त्यानंतर लेखी परीक्षा या सर्व बाबीत नयन यशस्वी ठरला.

 

नयन च्या यशाबद्दल नाशिक शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी  मच्छिंद्र कदम , उपशिक्षणाधिकारी  कोठारी कन्या विद्यालयाच्या  प्राचार्या  सुनीता जोशी  यांच्या हस्ते गौरव चिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

 

सोमवार दि. ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय – अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात नयन कोष्टी नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे . ही बाब आर. के. एम. विद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना विद्यालयातील शिक्षकांनी  व्यक्त केली.

कळवण एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष  रावसाहेब अमृता शिंदे, उपाध्यक्ष हर्षवर्धन पवार, सरचिटणीस  भूषण पगार व सर्व विश्वस्त मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन. डी. देवरे, उपप्राचार्य एस. पी. बागुल, उपमुख्याध्यापक जे. आर. जाधव, पर्यवेक्षक पी. एम. महाडीक, डी. जे. पवार यांनी नयनचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

विद्यालयातील विज्ञान शिक्षक  व्ही. एन. पिंपलीस्कर, एस. एल. निंबेकर, के. एच. खैरनार, डी. बी. गावित,  व्ही. एस. शिरसाठ, श्रीमती एस. एस. गांगुर्डे, श्रीमती एस. एच. आहेर यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content