चाळीसगाव,प्रतिनिधी| नवनिर्वाचित सरपंचांना अधिकारासह जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत यशदातर्फे नाशिक येथे चार दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान सन:२०२१-२२ अंतर्गत नवनिर्वाचित सरपंचांना त्यांच्या पदाचे कार्य, अधिकार व जबादारीची जाणीव करून देऊन ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासाठी प्रोत्साहित करण्यासाठी याशदाकडून प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचे आयोजन नाशिक येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था याठिकाणी करण्यात आले आहे. सोमवार, २५ आक्टोंबर ते २८ आक्टोंबर २०२१ पर्यंत प्रशिक्षणाची कालावधी असणार आहे. दरम्यान सरपंच यांच्या जेवणापासून तर राहण्याचे खर्च संस्थेने उचलले आहे. तसेच प्रशिक्षणासाठी ये-जा करण्यास लागणारा खर्च हे ग्रामनिधीतून खर्च करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे नूतन सरपंचांना त्यांच्या अधिकार व जबाबदारीची जाणीव होणार आहे. व गावात विकास कसा करावा याचे नवनवीन संकल्पना त्यांना अवगत होणार असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.