जामनेर : प्रतिनिधी । शहरातील पहूर रस्त्यावरील बंद पडलेल्या ज्योतीबाबा पेट्रोलपंपाच्या परिसरात सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर नाशिक येथील पोलिसांनी छापा टाकला आहे.
नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. यात जुगारअड्डा चालविणारे व खेळणारे असे मिळून सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
विशाल वाघ, अरुण नरवाडे, राहुल माळी, दीपक भोई, दिलीप माळी, सुमेध जाधव (सर्व रा. जामनेर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या छाप्यात आठ मोटारसायकल, जुगाराच्या साहित्यांसह ४१ हजारांवर रोख रक्कम असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला, सहा जणांना अटक केली आहे.