नारीशक्ती गृपतर्फे आदिवासी वस्तीत फराळ व साड्यांचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी | धरणगाव तालुका येथील साळवा येथील वैतागवाडी आदिवासी वस्ती नांदेड रस्ता येथे नारीशक्ती गृप जळगावतर्फे दिवाळी फराळ व साड्यांचे वाटप करण्यात आले.

 

नारीशक्ती गृपतर्फे वैतागवाडी आदिवासी वस्तीतील १५० कुटुंबाना फराळ व साड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे, नारीशक्ती गृप अध्यक्ष मनिषा पाटील, सरपंच ईशा बोरोले, उपसरपंच सतीश पवार, सदस्य मनोज सोपान अत्तरदे, सदस्य चंद्रलेखा सतीश पवार, सदस्य भूषण बऱ्हाटे, सदस्य आशा संजय कोल्हे, ग्रामविकास अधिकारी तुकाराम मराठे, पोलिस पाटील निसार पटेल, संजय कोल्हे, नारीशक्ती गृपच्या सुमित्रा पाटील, ज्योती राणे , ॲड. सीमा जाधव, भावना चौहान, नूतन तासखेडकर, किर्ती पाटील विशाल भावसार कल्याणी पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गावातील दीपक भालेराव , किशोर बोरोले, किरण फालक यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचलन साळवा येथील शिक्षीका व नारीशक्ती ग्रुपच्या ज्योती राणे यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी तुकाराम पुंडलिक मराठे यांनी मानले.

Protected Content