यावल प्रतिनिधी । जुने भांडण उकरून काढल्याच्या कारणावरून तालुक्यातील नायगाव येथील एका आदिवासी तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की सलीम सिराज तडवी (वय १९वर्ष राहणार नायगाव तालुका यावल) याने काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. याबाबत मयताचे वडील सिराज बाबु तडवी वय ५३वर्ष यांनी खबर दिल्याने यावल पोलीसांनी अक्समात मृत्यु नोंद दाखल केली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार व पोलीस कर्मचारी संजय लक्ष्मण देवरे हे करीत आहे.
मयताचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रल्हाद पावरा यांनी केले असुन दरम्यान सलीम तडवी या तरूणाने मुलामुलांच्या भांडणातुन वाईट वाटुन घेवुन आत्महत्या केली असावी अशी माहिती समोर आली आहे.