जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिरसोली रोडवरील एका नामांकित महाविद्यालयाच्या युट्यूब चॅनलवर अनोळखी व्यक्तीने अश्लिल भाषेचा वापर करून महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सोमवारी १५ ऑगस्ट रोजी सायबर पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात नामांकित संस्था असून त्या संस्थेच्या माध्यमातून नामांकित महाविद्यालय चालविले जात आहे. या महाविद्यालयाचे युट्यूवर चॅनल देखील आहेत. यावर महाविद्यालयातील कार्यक्रमांचे व्हिडीओ किंवा शैक्षणिक संदर्भातील व्हिडीओ अपलोड केले जातात. ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयाच्या युट्यूब चॅनलवर एका कार्यक्रमांसदर्भात व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहे. दरम्यान, अपलोड केलेल्या व्हिडीओला सदाफ शेख या नावाच्या व्यक्तीने अश्लिल भाषेचा वापर करून संस्थेसह प्राध्यापक आणि कर्मचारी यांची बदनामी केले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील महिला प्राध्यापक व इतरांच्या मोबाईलवर अश्लिल मॅसेज पठविल्याचा प्रकार समोर आला आहे. याबबात महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सोमवारी १५ ऑगस्ट रोजी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात सदाम शेख या नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.