जळगाव प्रतिनिधी । निकाल जाहीर होणार असल्याने नापास होण्याच्या भितीने प्रथम वर्ष वाणिज्य वर्षाच्या विद्यार्थीनीने मू.जे. महाविद्यालय आवारात फिनाईल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.
महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांच्या प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित विद्यार्थीनीला जिल्हा रुग्णालयात हलविले. तिच्यावर उपचार सुरु आहे.
घरुनच बाटलीत आणले फिनाईल
भादली येथील विद्यार्थीनीचे वडील शेती करतात. भादलीहून अपडाऊन करुन ती मू.जे. महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य या शाखेत शिक्षण घेत आहे. प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या काही दिवसांपूर्वी परीक्षा झाल्या. या परिक्षांचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. या परिक्षेत तीन ते चार विषयात नापास होणार या भितीने भादली येथील विद्यार्थीनी तिच्या घरुन बाटलीत भरुन फिनाईल घेवून शुक्रवारी मू.जे महाविद्यालयात आली. याठिकाणी 2 वाजेच्या सुमारास फिनाईल प्राशन करुन तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यानी हलविले रुग्णालयात
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तसेच संबंधित विद्यार्थीनीच्या मित्र-मैत्रिणींच्या प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी विद्यार्थीनीला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी दाखल केल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यार्थीनीच्या आई-वडीलांना प्रकार कळविला. शेतात काम करणार्या आई वडीलांना प्रकार ऐकल्यावर धक्का बसला. त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी विद्यार्थीनीचा जबाब घेतला असता, नापास होण्याच्या भितीने कृत्य केल्याचे तिने सांगितले. घटनेन महाविद्यालयात एकच खळबळ उडाली होती.