जळगाव – नाथ फाऊंडेशनकडून स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेन्टर येथे व रामेश्र्वर काँलणी मंजुराना गंहु, तांदूळ, सँनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले आहे.
आज १ मे शनिवार रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त नाथ फाउंडेशनकडून स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या ८ व्या स्मृती दिनानिमित्त नाथ फाऊंडेशन जळगाव या संस्थेच्यावतीने जळगाव लोकसंघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटर येथे रामेश्र्वर कॉलनीतील गोरगरीब मंजूर नागरिकांना चार पोते गंहु, दोन पोते तांदूळ, २०० मास्क, २०० सँनिटायझर बॉटल जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अघ्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी, माजी आमदार मनिष जैन यांच्या हस्ते गहु, तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी लोकसंघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटरचे सचिव सचिन धांडे, सहसचिव भरत कर्डीले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, नाथ फाऊंडेशनचे अघ्यक्ष अशोक लाडवंजारी, उपाध्यक्ष सुनिल भैय्या माळी, डॉ. अभिषेक ठाकूर, महानगर सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे, युवा मोर्चा सरचिटणीस विशाल देशमुख, गौरव डांगे आदींच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले आहे. स्व . निखिलभाऊ खडसे यांना दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली