जळगाव प्रतिनिधी । कलावंत घडविण्याचं हे व्यासपीठ असून पूर्वीच्या काळी नाट्यक्षेत्राकडे कल असला तरी हव्या तशा संधी उपलब्ध नव्हत्या मात्र आता काळ बदलला असून नाट्य क्षेत्राला आता चांगले दिवस आल्याने आजच्या युवकांनी नाट्य क्षेत्राकडे वळावे, असे मत हरीशभाई मिलवाणी यांनी पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले.
केसीई सोसायटी पुरस्कृत आणि मू.जे.महाविद्यालय (स्वायत्त) संचालित कान्ह ललित केंद्र जळगाव आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे सध्या पाच वर्षापासून मू. जे महाविद्यालय आयोजन करण्यात आहे.
यावेळी व्यासपीठावर केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, मु.जे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, महाराष्ट्रीय कलोपासक पुण्याचे राजेंद्र नागरे, परीक्षक म्हणून नाशिकचे प्राजक्त देशमुख, पुण्याचे प्रदीप वैद्य, नितीन धनधुके उपस्थित होते. हरीश भाईमिलवाणी यांचे स्वागत प्रा. चारुदत्त गोखले यांनी केले तर चारुदत्त गोखले यांचे स्वागत शशिकांत वडोदकर यांनी केले. शशिकांत वडोदकर तसेच राजेंद्र नागरे यांचे स्वागत डॉ.उदय कुलकर्णी यांनी केले. परीक्षक म्हणून लाभलेले प्राजक्त देशमुख यांचे स्वागत शशिकांत वडोदकर प्रदीप वैद्य यांचे स्वागत हरीश भाई मिलवानी यांनी तर नितीन धनधुके यांचे स्वागत प्रा. चारुदत्त गोखले यांनी केले.
प्रास्ताविकात प्राचार्य उदय कुलकर्णी यांनी गेल्या पाच वर्षापासून मू.जे महाविद्यालय पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करते आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन असते. याप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थी हा चांगला नागरिक घडावा यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला पदवी घेण्याआधी कुठलीतरी एक कला आली पाहिजे जेणेकरून तो चांगला नागरिक घडावा .तसेच महाविद्यालयातून बाहेर पडताना सूज्ञ नागरिक असतो असा यामागचा प्रांजळ उद्देश असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत हिरिरीने सहभाग घ्यावा असे मत डॉ.उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा.योगेश महाले यांनी केले.