*पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील नाचणखेडा येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाचणखेडा येथील कोमल नारायण महाजन (माळी) वय – ४२ हे कर्जाला कंटाळून ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ११:३० वाजताच्या सुमारास शेतात विषारी औषध प्राशन केले. सदरचा प्रकार गावातील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र मृत्युशी झुंज देत असतांना सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मयत कोमल महाजन यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोमल महाजन यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.