जळगाव,प्रतिनिधी । आज शहरातील गजबजलेल्या चित्रा चौकात संध्याकाळी रस्त्यावर एक साप फिरत असल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. काही जागरूक नागरिकांनी सर्पमित्रांना बोलविले असता त्यांनी त्या सापास जिवंत पकडल्याने नागरिकांचा समाधान व्यक्त केले आहे.
आज सोमवार दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजेदरम्यान चित्रा चौकात एक साप रस्त्यावर फिरत होता. यामुळे काही काळासाठी चौकात वाहतूक खोळंबली होती. यावेळी एका जागरूक नागरिकाने वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली. यानंतर सर्पमित्र जगदीश बैरागी, ऋषीकेश राजपूत हे चित्र चौकात तत्काळ दाखल झालेत. तेव्हा त्यांनी सापास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, साप चपळाईने रस्त्यावर उभ्या असलेल्या जेसीबीमध्ये शिरला. सर्पमित्रांनी त्यास शिताफीने पकडले. यावेळी वेळेत पोहचून सापास जीवनदान दिल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, सर्पमित्र जगदीश बैरागी यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले की, जनजागृती झाल्यानेच आज एका सापास जीवनदान मिळाले आहे याचा आपणास आनंद होत आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/557058739048015