खळबळजनक : नागपूर शहरात गेल्या ४८ तासांत चार खून !

नागपूर (वृत्तसंस्थ) नागपूर शहरात गेल्या ४८ तासांत चार खुनाच्या घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

 

गुरुवारी दुपारी सक्करदऱ्यातील भांडे प्लॉट येथे कौटुंबीक कलहातून सोनू शेख याने नऊ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीची हत्या करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री गिट्टीखदानमधील पंचशिलनगर येथे सचिन अलोणे या गुन्हेगाराची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी अजनीतील अभयनगर येथे प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून केला. तर मानकापूरमध्ये शनिवारी सकाळी दगडाने ठेचून युवकाची हत्या करण्यात आली. चिंगारू हे मृतकाचे नाव असून तो कचरा वेचायचा.

Protected Content