वाशिम (वृत्तसंस्था) नागपूर – औरंगाबाद महामार्गावर चांडस गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात आई, वडील आणि मुलगा असे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला.
किसन कड ( वय 71 ), जिजाबाई कड ( वय 62 ) आणि मुलगा अमोल कड (वय 30 ) अशी मयतांची नावं आहेत. हे तिघे जण डोणगांव इथे मुलगा अमोल कड यांच्या पत्नीचे माहेरकडील आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी कारने जात होते. चांडसजवळ पोहोचले असता अचानक भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आई,वडील आणि मुलगा हे जागीच ठार झाले आहेत. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळे वाशिम जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.