जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील नागन चौकी गावा शेजारी दुचाकी वाहन व रिक्षाची समोरासमोर धडक झाल्यामुळे दुचाकीचालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली असून ॲपे रिक्षा चालकही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
शुक्रवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सामरोद येथील रिक्षाचालक (एम. एच. १९ एस २५५६) ही मालवाहू रिक्षा रामपूर गावांमध्ये ऊस विकण्यासाठी आला होता. तो परत जात असताना तिकडून रामपूर गावाकडे येणारा दुचाकी वाहनधारक दरबार संगडा चव्हाण (वय ४८, रा. रामपूर) यांच्या दुचाकी वाहन व रिक्षा समोरासमोर धडक झाल्यामुळे दुचाकीचालक दरबार चव्हाण या अपघातात जबर मार लागला त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरबार चव्हाण यांना एक मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. या घटनेबाबत जामनेर पोलिस आज रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल होण्याचे काम सुरू होते.