

पाचोरा, नंदू शेलकर । तालुक्यातील नांद्रा शिवारा लगतचा जंगलाला लागून असणारा ताडमळ्यामध्ये शेतीत मजूर दादर कापणीसाठी गेले असता त्यांना तेथे बिबट्याची तीन छोटी पिल्ले आढळून आली आहेत.
नांद्रा शिवरात संजय रामराव पाटील यांच्या मालकीच्या गट नंबर १७५ च्या शेतात आज दादर कापणीसाठी गावातील मजूर गेले होते. त्या ठिकाणी त्यांना त्याच शेतात बिबट्याची तीन छोटे पिल्ले आढळून आलेत. यावेळी प्रत्यक्षदर्शीने भूषण तावडे व इतर शेतकरी यांनी तात्काळ ही गोष्ट वन विभागातील कर्मचारी यांना भ्रमणध्वनीवरून सांगितली. खबर मिळताच काही क्षणातच त्या ठिकाणी वन विभागाचे वन क्षेत्रपाल डी. एस. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुनील भिलावे, जगदिश ठाकरे, अमृता भोई, ललित पाटील, प्रकाश सूर्यवंशी, रामसिंग जाधव,राहुल कोळी,सचिन कुमावत यांचे पथक दाखल झाले.या पथकाने तेथेच त्या शेतात एका ठिकाणी तिघे पिल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी छावणी केली जेणे करून बिबट्याची मादी येऊन त्यांना सुखरुप घेऊन जाईल. त्या परिसरात संपूर्ण वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत. याप्रसंगी रात्रीही पळत ठेवणार आहेत.यासाठी नाईट व्हिजन कॅमेरा लावून नजर ठेवण्यात येणार आहे. परंतु आद्याप शेतकरी वर्गाच्या जमिनीत अजूनही दादर, मक्का, गहू, कपासी असे पिके काढण्याचे असून त्यामुळे शेतात एकटे व्यक्ती, महिलावर्ग, किंवा बालके जाण्यास घाबरत आहेत. पुन्हा एकदा संपूर्ण वनखात्यात वन विभागातील संरक्षण कंपाऊंडचा विषय ऐरणीवर आला आहे. जर त्या जंगलाला कंपाऊंड करण्यात आले तर वन्य प्राणी गावाकडे वाटचाल करणार नाही व प्रसंगी अशा या अजून घडणाऱ्या हिँस्ञ घटना घडणार नाही असे बोलले जात आहे. यापूर्वीही झाडावर बिबट्या चढण्याचं त्याबरोबरच गावालगतच्या शेताजवळ गाई वासरांचा फडशा पाडल्याचा घटना ताज्या असतानाच आताही हि बिबट्या मादी आपल्या पिल्लांना सोबत कुठपर्यंत या परिसरात घेऊन वास्तव्य करते किंवा निघून जाते यावर आता वन विभागाला बारीक लक्ष ठेवावे लागणार असून प्रसंगी रेस्क्यू ऑपरेशन ही करावे लागू शकते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/234744541731127


