नशिराबाद प्रतिनिधी । हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्याकाठ्याचा वापर करून हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चंदन एकनाथ धनगर (वय-३०) रा. पेठभाग नशिराबाद शेती काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. १५ मार्च २०२१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गल्लीतील गोपाळ गोविंद धनगर याने जुन्या भांडणाच्या वादातून दारूच्या नशेत चंदन धनगर यांना शिवीगाळ करून डोक्यात लाकडी काठी मारून दुखापत केली. तर भगवान गोविंदा धनगर, खूशाल गाविंदा धनगर आणि गोविंदा भोजू धनगर सर्व रा. राह पेठ भाग नशिराबाद यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. चंदन धनगर यांच्या फिर्यादीवरून गोपाळ धनगर, भगवान धनगर, खुशाल धनगर आणि गोविंदा धनगर यांच्याविरूध्द नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.
दुसऱ्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुनिता भगवान धनगर (वय-३५) रा. पेठभाग हे आपल्या परिवारासह राहतात. गल्लीत हळदीचा कार्यक्रम असल्याने नाचण्याच्या कार्यक्रमात दिर गोपाळ धनगर हे नाचत असतांना गल्लीतील लोकेश प्रल्हादा धनगर, चेतन संतोष धनगर, कुंदन एकनाथ धनगर रा. नशिराबाद आणि भुषण ज्ञानेश्वर बाविस्कर रा. डोंबरकठोरा ता. यावल यांनी गोपाळ धनगर याला लाकडी काठ्या घेवून घराच्या बाहेर बोलावून शिवीगाळ केली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सुनिता धनगर यांना देखील पायाला काठी मारून दुखापत केली. सुनिता धनगर यांच्या फिर्यादीवरून चौघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण ढाके करीत आहे.