जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशीराबाद येथील मोमीन मोहल्ला जवळ आवाज देवून थांबविल्यावर, मला थांबविले असा जाब विचारल्यावर तरुणासह इतर तीन जणांना ६ जणांनी बेदम केल्याची घटना रविवार, २१ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. यात घटनेत चारही जण जखमी झाले असून याप्रकरणी नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशीराबाद येथे मोमीन मोहल्ला येथे वसीम शहा रहेमान शहा वय २३ हा वास्तव्यास आहे. २१ रोजी सकाळी वसीम शहा हा घराजवळ असतानां याच परिसरात राहणारे शरीप पिंजारी यांच्यासह पाच ते सहा जण याठिकाणी आले.त्यांनी वसीम शहा यास आवाज देवून थांबविले, , वसीम शहा याने मला का थांबविले असे विचारले असता, शरीफ पिंजारी यांच्यासह त्याच्यासोबतच्या सहा जणांनी वसीम शहा यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यात मारहाणीत वसीम शहा याच्या डोक्याला गंभी दुखापत होवून सहा टाके पडले आहेत. यावेळी तीन जण हे भांडण सोडविण्यासाठी आले असता, सहा जणांनी तिघांनाही मारहाण केली, या तिघांपैकी एजाज पिंजारी व अख्तर शहा सादीक शाहा यांना सुध्दा डोक्यात टाके पडले असून अक्रम शहा याच्या हाताचे हाड मोडले आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी वसीम शहा याने रात्री दिलेल्या तक्रारीवरुन शरीफ पिंजारी, कलीम शरीफ पिंजारी, शोएब शरीफ पिंजारी, शकीना पिंजारी, हसीना पिंजारी, व रशीदा पिंजारी सर्व रा. मोमीन मोहल्ला, नशीराबाद या सहा जणांविरोधात नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस हेडकॉन्स्टेबल युनूस शेख हे करीत आहेत.