पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा – भडगाव विधानसभा क्षेत्रातील ज्या युवकांचे वय १८ वर्ष पुर्ण झालेले असेल त्या मतदारांनी आपले नांव आपआपल्या मतदार संघातील बी.एल.ओ. यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत नोंदवुन घ्यावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील आणि तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे.
याबाबत उपविभागीय कार्यालयाकडुन मिळालेली माहीतीनुसार, पाचोरा – भडगाव विधानसभा या मतदारसंघातील १ जानेवारी २०२१ रोजी ज्या युवकांचे वय १८ वर्ष पुर्ण होत असेल. तसेच त्याआधी १८ वर्ष वय पुर्ण झाले आहे. अशा युवकांनी जर मतदार यादीत नाव नोंदणी केली नसेल त्यांनी आपल्या शहरातील मतदान केंन्द्र व प्रभाग निहाय तसेच गावात नेमणुक करण्यात आलेल्या बी.एल.ओ. यांच्याकडे अथवा आॅनलाईन नमुना नं. ६ तील अर्ज भरुन निःशुल्क मतदार याद्यांमध्ये नांव नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सादर करून आपले नांव मतदार यादीत नोंदणी करून घ्यावी. तसेच ज्या मतदारांना नावाच्या अथवा छायाचित्राच्या तपशिलात काही बदल करायचे असतील त्यांनी नमुना – ८ भरुन आवश्यक बदल करणेसाठी अर्ज करावा. व विधानसभा क्षेत्रातील पत्त्यात बदल करायचा असल्यास नमुना – ८ ‘अ’ अर्ज भरुन पत्त्यात बदल अथवा दुरुस्ती करून घ्यावी. याकरीता मुख्य निवडणुक आयुक्त, मुंबई यांच्या आदेशान्वये पाचोरा – भडगाव १८ – विधानसभा मतदारसंघातील नांव नोंदणीची निवडणुक प्रक्रीयापुर्ण करण्यासाठी एकुण यादी भाग – ३२८ नुसार ३२८ बी.एल.ओं. ची नेमणुक करण्यात आली आहे. या निवडणुक मतदार नांव नोंदणीच्या राष्ट्रीय कार्यात जागृत नागरीकांनी व युवकांनी तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी सर्व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात आपला सहभाग नोंदवुन आपआपल्या क्षेत्रातील व परिसरातील १८ वर्ष पुर्ण झालेल्यांची मतदार यादीत नांव नोंदणी करून आपल्या देशातील लोकशाही बळकट करणाऱ्या मतदार नोंदणी अभियानास यशस्वी करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे व निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार संभाजी पाटील यांनी केले आहे.